शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ंशाहूनगरीत सलोखा कायमच ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 01:01 IST

कोल्हापूर : राजर्षी शाहूंच्या पुरोगामी नगरीत सामाजिक सलोख्याची परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून झाला आहे; परंतु यामुळे येथील सलोख्यावर कोणताही परिणाम झाला नसून, तो जिवंत आहे. हा सलोखा इथून पुढेही कायम ठेवू, असा निर्धार सर्व पक्ष, सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी रविवारी येथे व्यक्त केला. लवकरच दलित संघटना व हिंदुत्ववादी संघटनांचा ...

कोल्हापूर : राजर्षी शाहूंच्या पुरोगामी नगरीत सामाजिक सलोख्याची परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून झाला आहे; परंतु यामुळे येथील सलोख्यावर कोणताही परिणाम झाला नसून, तो जिवंत आहे. हा सलोखा इथून पुढेही कायम ठेवू, असा निर्धार सर्व पक्ष, सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी रविवारी येथे व्यक्त केला. लवकरच दलित संघटना व हिंदुत्ववादी संघटनांचा मेळावा घेऊन गैरसमज दूर करण्यात येतील, असे बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष संभाजी साळुंखे यांनी सांगितले.सामाजिक सलोखा कायम ठेवून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनातर्फे पोलीस मुख्यालय येथील पोलीस उद्यान येथे सद्भावना मेळावा आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थितीहोती. या मेळाव्यात शाहूंच्याभूमीतील सलोखा कायम टिकवून ठेवण्याचा निर्धार सर्वांनी केला. यानंतर पत्रकारांशी बोलताना विविध पक्ष, संघटनांच्या प्रतिनिधींनी कोल्हापूरची सामाजिक सलोख्याची वीण घट्ट असल्याच्या भावना व्यक्त केल्या.यावेळी महापौर स्वाती यवलुजे, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, रिपाइं (ए)चे पश्चिम महाराष्टÑ अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, रिपाइं (गवई)चे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वास देशमुख, ‘पीआरपी’चे जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निवास साळोखे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष संभाजी साळुंखे, शहराध्यक्ष महेश उरसाल, ब्लॅक पॅँथरचे अध्यक्ष सुभाष देसाई, राष्टÑवादी कॉँग्रेसचे आर. के. पोवार, कॉँग्रेसचे सुरेश कुराडे, ‘भाकप’चे नामदेव गावडे, सतीशचंद्र कांबळे, मल्हार सेनेचे बबन रानगे, मुस्लिम बोर्डिंगचे कादर मलबारी, बाळासाहेब भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, उद्योजक चंद्रकांत जाधव, आदी उपस्थित होते. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी प्रास्ताविक केले. पोलीस अधीक्षक मोहिते यांनी आभार मानले.महाराष्टÑातील सामाजिक एकतेची वीण अत्यंत घट्ट आहे. त्यामुळे ही वीण विस्कटण्याचा प्रयत्न करणाºयांना त्यात कधीच यश मिळणार नाही. खूप मेहनतीने या देशाला अखंड ठेवण्याचा प्रयत्न आपल्या पूर्वजांनी केला आहे. त्यामुळे सर्वजण गुण्या-गोविंदाने नांदूया. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या अप्रिय घटना भविष्यात घडू नयेत यासाठी दक्ष राहूया.-चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्रीनवीन वर्षाची सुरुवात वाईट घटनेने झाली. अशा घटना परत होऊ नयेत आणि सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी सद्भावना मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यातून एकात्मतेची बीजे रोवली जातील.- विश्वास नांगरे-पाटील,विशेष पोलीस महानिरीक्षक